Shreyash

हि व्यक्ती श्रेयस साठी बनली एकदम खास, ती सेटवर असताना माझा वेळ कसा जातो हे कळत नाही

Zee मराठीवर नुकतेच ‘माझी तुझी रेशीमगाठ‘ या मालिकेचे प्रोमो रिलीज करण्यात आले आहे. या प्रोमोने सर्व प्रेक्षक वर्गाचे लक्ष्य वेधून घेतले आहे. या मालिकेचा मुख्य नायक श्रेयस तळपदे आहे आणि तो या मालीकेतून मराठी टेलीविजनवर पदार्पण करीत आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील दिसणार आहे. अर्थातच या दोन्ही कलाकारांचे असंख्य चाहते देखील आहे. प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी भरपूर उत्सुकता देखील निर्माण झाली आहे.

श्रेयसने नुकत्याच सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्याबद्दल श्रेयशने सांगितले कि ‘माझा इक्बाल हा चित्रपट 16 वर्षांपूर्वी याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट श्रेयशच्या करीअरसाठी खूप महत्वाचा ठरला होता आणि या चित्रपटा मुळे मला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम देखील मिळाले होते’. तसेच श्रेयशने काही वर्षांपूर्वी प्रोड्यूस केलेला मराठी चित्रपट पोश्टर बॉईझ देखील ऑगस्ट मध्येच प्रदर्शित झाला होता. पोश्टर बॉईझ या चित्रपटालातर प्रेक्षकांनी खूपच पसंत केले होते. आता श्रेयशची नवी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ देखील Zee मराठी वाहिनीवर ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला एक गोड चिमुकली पाहायला मिळते जी श्रेयशला बरेच प्रश्न विचारते आणि श्रेयश तिच्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे देताना दिसत आहे. या गोड मुलीचे नाव मायरा असे आहे. या मुलीने मालिका प्रदर्शित होण्या पूर्वीच सर्व प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतले आहे आणि प्रेक्षकांची मायरा लाडकी बनली आहे. श्रेयशची मुलगी आद्या हि सुद्धा मायराच्याच वयाची आहे. मायरा विषयी बोलताना श्रेयशने सांगितले कि मायरा खरोखर खूप गोड मुलगी आहे.

श्रेयशने त्याच्या मुलीला मायरा विषयी भरपूर काही सांगितले आहे. त्यामुळे आद्याला देखील मायराला भेटण्याची खूप इच्छा आहे. श्रेयशने आद्याला वचन दिले आहे कि तो लवकरच तिला शुटींगच्या सेट वर घेऊन जाणार आहे आणि तिची मायरा सोबत भेट करून देणार आहे.

मायरा विषयी बोलताना श्रेयशने सांगितले कि मायरा नेहमी आम्हाला शूटिंगच्या व्यतिरिक्त देखील खूप बिझी ठेवत असते. मायरा शुटींग सेट वर असताना आमचा वेळ कसा निघून जातो हे देखील आम्हाला अजिबात कळत नाही. मी देखील एक पिता आहे त्यामुळे मला हे चांगलेच कळते कि मायराला कधी आराम करायचा आहे, मायराला कधी भूक लागते, तिची काळजी कशी घेतली पाहिजे. त्यामुळे मायरा हि व्यक्ती श्रेयससाठी एकदम खास बनली आहे. Zee मराठी या वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका २३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.