‘मला नुसती लाईन मारता येते’ या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आल्या शिवाय राहणार नाही

अभ्यास म्हटले की जणू लहान मुलांच्या अंगावर काटा येतो. कधी एकदा तो अभ्यासपूर्ण होतो आणि कधी खेळायला जातो असेच लहान मुलांच्या मनात चाललेले असते. अर्थात त्यात त्यांचा कुठलाही दोष नाही लहानपण म्हटले की असे होणारच. काही पालकांना त्यांच्या मुलांचा अभ्यास घेणे म्हणजे जणूकाही तारेवरची कसरतच वाटते. त्यामुळे ते अभ्यासासाठी त्यांच्या मुलांना ट्युशन क्लासेस लावून देतात.

ही लहान मंडळी स्वतःहून अभ्यास करायला बसले असे खूप कमी बघायला मिळते. परंतु त्यातही काही मुले असे असतात ज्यांना खरोखरच अभ्यास करण्याची आवड असते आणि अशा मुलांना अभ्यास करण्यासाठी ट्युशन लावण्याची देखील गरज पडत नाही.

सध्याच्या धावत्या जगामध्ये पालकांकडे ही पुरेसा वेळ नसतो कि ते बसून त्यांच्या मुलांचा अभ्यास घेऊ शकतात. यासाठी सध्या ट्युशन वर देखील जास्त जोर दिला जातो आणि यामार्फत मुलांचा अभ्यास देखील होत असतो. आता तुम्हा सर्वांना असा प्रश्न पडला असेल की हे सर्व आम्ही तुम्हाला का सांगत आहोत? तर त्याचे कारण असे आहे की आज आम्हाला सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ सापडला आहे. ज्यात एक मुलगा ट्युशन साठी गेला असताना त्यांला अभ्यास करावासाच वाटत नाही. परंतु ट्युशनमध्ये शिकवणाऱ्या टीचरच्या धाकाने तो कसाबसा अभ्यास करीत आहे.

टीचर ने विचारलेल्या प्रश्नांचे हा मुलगा कसे निरागसपणे उत्तर देतो हे पाहून तुम्हाला देखील हसू आल्या शिवाय राहणार नाही.

या मुलाचा निरागस चेहरा आणि प्रश्नावर दिलेले उत्तरे कॅमेरात कैद करून घेतले आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये श्रीराज नावाचा मुलगा ट्युशन साठी गेला आहे आणि तो टीचरच्या बाजूला बसून शिकत आहे. या व्हिडिओ मध्ये असे बघायला मिळते की टीचर श्रीराजला अभ्यास कर असे सांगत आहे आणि हे काय लिहीत आहे असे रागावून विचारत आहे.

त्याने वहीवर जे काही लिहिले आहे ते पाहून ही टीचर त्याला ओरडते. टीचरने रागावल्या नंतर हा मुलगा विचारतो कि ‘वन’ हा अंक काढू का? आणि त्याला टीचर होकार देते. त्याने ‘वन’ काढून झाल्यानंतर टीचर त्याला ‘टू’ हा अंक काढायला सांगते. तेव्हा श्रीराज वहीवर पटकन ‘टू’ हा अंक काढून दाखवतो. त्यानंतर टीचर त्याला ‘थ्री’ हा अंक काढण्यास सांगते.

त्यावर श्रीराज निरागस पणे आणि रडत रडत टीचरला असे सांगतो की मला ‘थ्री’ च नाही काढता येत. त्यानंतर टीचर त्याला ‘ए फॉर एप्पल’ काढायला लावते. पण तो सांगतो की ‘मला ते पण नाही काढता येत’. त्याचे हे उत्तर ऐकून टीचर त्याला खोटे खोटे रागवून विचारते की मग काय तुला काढता येते? त्यावर श्रीराज टीचरला असे उत्तर देतो की ‘मला ना, नुसती लाईन मारता येते.’ आणि हे उत्तर देताना त्याच्या चेहऱ्यावरील निरागस पणा आणि डोळे पाण्याने भरलेले देखील आपण स्पष्ट पाहू शकता तसेच या मुलाचा निरागस पणा पाहून तुम्ही देखील सहज त्याच्या साधेपणात हरवून जाणार.

त्याचे हे उत्तर ऐकून टीचर त्याला विचारते की नुसतं लाईन मारत येते मग पुढे तुला शिकायचे की नाही? त्यावर तो असे म्हणतो की ‘नाही शिकायचे’. त्याला टीचर विचारते का नाही शिकायचे. या प्रश्नाचे उत्तर देतो आणि बोलतो कि ‘मला ना त्याच्यामुळे नाही शिकायचे’. परंतु त्याच्यामुळे म्हणजे नक्की कशामुळे हे काही त्याला व्यवस्थित पणे सांगायला जमले नाही.

टीचर त्याला बोलते की तू जर अभ्यास नाही केला, तर तू तुझ्या बाबांसारखा डॉक्टर कसा होशील? तुला व्हायचे आहे ना डॉक्टर? त्यावर मुलगा असे बोलतो की ‘व्हायचे आहे डॉक्टर,. मी अभ्यास घरी करून येतो. परंतु या व्हिडिओ मध्ये दिसणारे या मुलाचे हावभाव बघून तुम्ही देखील या मुलाच्या निरागस पणावर सहज प्रेम कराल आणि त्याची ही मजेशीर झालेली फजिती बघून तुम्हाला देखील हसू नक्की येईल.

मित्रांनो या मुलाचे नाव श्रीराज असे आहे आणि त्याच्या पालकांनी त्याचे यूट्यूब चॅनल देखील बनवले आहे आणि त्याच्या चॅनलचे नाव ‘Shreeraj Vlogs’ आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला श्रीराजचे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्हाला श्रीराजचा अभ्यास करताना चा व्हिडिओ बघायचा असेल तर हा व्हिडीओ आम्ही खाली दिलेला आहे. तो तुम्ही क्लिक करून बघू शकता तसेच या व्हीडीओ विषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.