आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री अरुंधती दिसणार नव्या भूमिकेत, पहा नवीन लूक

सध्या आई कुठे काय करते हि मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु आहे आणि हि मालिका सध्या घराघरात पसंत केली जात आहे. या मालिकेची कथा सर्व प्रेक्षकांना आपलेसे करून घेते. त्यामुळे या मालिकेतील सर्व पात्रे हे प्रेक्षकांच्या जणू घरातील सदस्य झाले आहेत. या मालिकेत प्रेक्षकांचे खास लक्ष्य वेधून घेतले ते अरुंधती या पात्राने. अरुंधती या पात्राला अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारात आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही आपल्याला या अभिनेत्री विषयी माहिती देणार आहोत. आई कुठे काय करते या मालिकेत काही दिवसांपूर्वीच एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे आणि त्या पात्राचे नाव आहे अविनाश.

असे दाखविले आहे कि अविनाश हा आप्पा यांचा मुलगा आहे परंतु त्याने आपल्या वडिलांसोबत आणि भावासोबत जमत नसल्यामुळे काही वर्षान पूर्वी घर सोडलेले असते. अविनाश आता आपल्या घरी परत आला आहे त्यामुळे संपूर्ण परिवार खूप आनंदात आहे. नंतर अविनाश आपल्या आप्पा जवळ येऊन बसतो आणि बोलतो कि मला तुमची खूप आठवण यायची. त्या नंतर तो आपाच्या पायावर डोके ठेऊन माफी देखील मागतो. अविनाशचे हे वागणे बघून आप्प्पा देखील भावूक होतात आणि अविनाशला माफ करतात. त्यानानातर तो अरुंधती कडून शपथ घेतो कि अरुंधती हिला तू कधीच सोडणार नाही ना? कारण अविनाशला संजना व अरुंधती या दोघांमध्ये काय सुरु आहे हे कळले असते. अशा प्रकारे या मालिकेत आपल्याला नवीन प्रसंग बघायला मिळत आहे.

या मालिकेत सर्व कलाकारानी उत्कृष्ट भूमिका साकारली आहे त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेतील सर्व कलाकार खूप आवडत आहे. तसेच या मालिकेत रुपाली भोसले या अभिनेत्रीने संजना हि भूमिका साकारली आहे. रुपाली भोसले हिने कलर्स मराठीच्या बिग बॉस 2 मध्ये देखील स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. तिची आणि अभिनेत्री विना जगताप या दोघान मध्ये चांगली मैत्री झाली होती. नुकताच रुपाली भोसले हिला राज्यपालांच्या हस्ते युथ आयकॉन 2021 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे रुपाली भोसले खूप चर्चेत आहे. तसेच हि अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या नेहमी टच मध्ये असते.

तसेच या मालिकेतील मुख्य अभिनेत्री अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये ती अतिशय सुन्दर आणि बोल्ड दिसत आहे. अभिनेत्री अरुंधती इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. या शेअर केलेल्या पोस्ट वरून वेगवेगळे तर्क प्रेक्षकांकडून लावण्यात येत आहे. अभिनेत्री अरुंधती आता एखाद्या नवीन मालिकेत दिसणार आहे का? किव्वा आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती नव्या लुकमध्ये दिसणार आहे का? अशे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे. त्यामुळे हि अभिनेत्री आता नेमके काय करणार आहे. याचे उत्तर तर येणाऱ्या काळातच आपल्याला मिळणार आहे. तो पर्यंत सर्व चाहते मंडळींना थोडीशी वाट बघावी लागणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published.